वैजापूरचे अवैध वसुली प्रकरण विधानसभेत; चौकशीचे आदेश

Foto
 वैजापूर, (प्रतिनिधी) : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी (ता. ७) काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी वैजापूर येथील आरटीओ विभागातील कथित अवैध वसुली रॅकेटचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी ध्वनिमुद्रण, कागदपत्रे आणि इतर कथित पुराव्यांचा हवाला दिला.

त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिले. चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी वैजापूरमध्ये अधिकार क्षेत्रावरून दोन संबंधित अधिकारी कर्मचारी आणि आरंटीओ अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे ध्वनिमुद्रण समोर आले होते. 

एकाच वाहनावर दोन्ही अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यामुळे वाहनचालकांत तीव्र नाराजी पसरली होती. या प्रकरणात एसीबीच्या कारवाईत सापडलेल्या व्यक्तीशी संबंधित एजंट राज्यभर अवैध वसुली करत असल्याचा आरोप आहे.